कुष्ठरोग मुक्तीकरीता सामाजिक जबाबदारीची गरज : डॉ. कुणाल खेमनार



कुष्ठरोग विकृती पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया शिबीर

चंद्रपूर, दि. 5 मार्च: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम जिल्हा, चंद्रपूर अंतर्गत कुष्ठरोग विकृती पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन डॉ.कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे शुभहस्ते शासकिय वैद्यकिय महाविद्यालय,चंद्रपूर येथे  पार पडले.

यावेळी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, शल्यचिकित्सक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, डॉ.सोनारकर , सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. संदीप गेडाम,   व   कन्सलटंट तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, आरएलटीआरआय भारत सरकार रायपूर, छत्तीसगढ  डॉ. कृष्णमुर्ती कांबळे व त्यांची तज्ञ डॉक्टरांची चमू यावेळी उपस्थित होती.

जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी मार्गदर्शनात कुष्ठरोग मुक्तीकरीता सामाजिक जबाबदारीची गरज आहे व याकरीता समाजातील सर्व लोकांनी जागृत राहुन कार्य केले पाहिजे जेनेकरुन कुष्ठरोगी जनता कुष्ठरोग मुक्त राहिल समाजात सन्मानाने जगेल असे  सांगितले.

कुष्ठरुग्णांनी व्यवस्थित औषधोपचार घेणे गरजेचे आहे,असे मार्गदर्शन डॉ. कृष्णमुर्ती कांबळे  यांनी कुष्ठरुग्णांना  केले.

सदर शिबीरात जिल्हयातील कुष्ठरोगाने विकृत रुग्णांची  एम एस आर्थो , कन्सलटंट तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, आर एल टी आर आय, भारत सरकार , रायपूर, छत्तीसगढ  डॉ. कृष्णमुर्ती कांबळे  व त्यांची तज्ञ डॉक्टरांची चमू  तसेच अलर्ट इंडीया, मुंबई यांची तज्ञ चमू मार्फत तपासणी करण्यात येत आहे. तसेच   कुष्ठरोगामुळे डोळे, हात ,पाय किंवा शरीराच्या इतर भागावरती असलेल्या विकृतीचे तपासणी करुन मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.  नंतर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला‌ 8 हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. काही विकृती रुग्णास शस्त्रक्रियेची गरज नसल्यास अशा विकृत रुग्णांना त्यांना आवश्यक असणारे भौतीक उपचार साधणे स्प्लीन्ट, अल्सर कीट इत्यादींचे वाटप करण्यात येणार आहे.

या कुष्ठरोग विकृती पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया शिबीरात ग्रामीण, शहरी भागातील 10 ते 15 वर्षापासुन कुष्ठरोगाने विकृत एकूण 92 कुष्ठरुग्णांची तपासणी करण्यात आली असून 34 कुष्ठरुग्णांची शस्त्रक्रियाकरीता निवड करण्यात आली आहे व निवड करण्यात आलेल्या विकृत कुष्ठरुग्णांवर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर येथे  एमएस आर्थो , कन्सलटंट,आरएलटीआरआय, भारत सरकार रायपूर, छत्तीसगढ  डॉ. कृष्णमुर्ती कांबळे व त्यांची तज्ञ डॉक्टरांची चमूव्दारे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच 26 कुष्ठरुग्णांना  स्प्लीन्ट व 6 कुष्ठरुग्णांना एमसीआर चप्पल वितरीत करण्यात आले. अशाप्रकारे महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हयात प्रथमच असे नाविण्यपूर्ण कुष्ठरोग विकृती पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया शिबीर प्रशासनाचे सहकार्याने राबविण्यात आले आहे.