ज्येष्ठ नागरिक सामाजिक व सांस्कृतिक भवन समितीची कार्यकारिणी गठित


चंद्रपूर:- (का.प्र.)
निर्माण नगर, आकेवार वाडी, तुकूम प्रभाग क्रमांक १ मधील ज्येष्ठ नागरिक सामाजिक व सांस्कृतिक भवन समितीची नवीन कार्यकारणी  सुभाष कासनगोटटूवार, पार्षद महानगरपालिका चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये 2020 ते 2023 या तीन वर्षाकरिता नुकतीच निवडण्यात आली. अध्यक्ष पदाकरिता श्री बबनराव धर्मपुरीवार, सचिव सौ. सुवर्णाताई लोखंडे, सहसचिव श्री रमेशभाऊ ददगाल, उपाध्यक्ष पदी श्री विवेकराव वैद्य, कोषाध्यक्ष अरविंदजी उपलींचवार तसेच सभासद सदस्य म्हणून सर्वश्री गणेशजी बनसोड, रामेश्वरजी खोडे, वसंतराव ठेमसकर, प्रकाशराव बागडदे, उपासराव भोजेकर, यशवंतराव रोहनकर, अशोकराव बोनगीरवार, विजयभाऊ लोखंडे, सौ अरुणाताई चिडे, सौ ममताताई गटलेवार, सौ रंजनाताई माणुसमारे. तसेच सल्लागार समितीमध्ये  सुभाष कासनगोटटूवार, एडवोकेट श्री सुखदेव जी वानखेडे, श्री दिवाकर राऊतकर, श्री कमलसिंह कछवाह, श्री सलीम शेख, श्री संजय ढेपे, अश्या वरील सर्व पदाधिकारी सभासद व सल्लागार समिती व कार्यकारणीची सर्वांच्या संमतीने नियुक्ती (निवड) करण्यात आली निवडणूक यशस्वी करण्याकरिता स्थानिक परिसरातील नागरिकांचे सहकार्य लाभले.