बदनापुर मध्ये कोरोनाचा लाॕकडाऊन फक्त सामान्य जनतेला व शेतकऱ्यांनाच ?



जालना / बदनापूर, 08 अप्रैल( प्रतिनिधि): बदनापूर तालुक्यामध्ये कोरोनाच्या भिती पोटी सर्वत्र संचारबंदी सह लाॕकडाऊन असून हा फक्त सामान्य जनतेसाठी आहे का ? असा प्रश्न नक्कीच उपस्थितीत होतो . या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॕकडाऊन असले तरी अवैद्य मुरुम उत्खनन करुन आज पण सर्सास विक्री होताना दिसत असून या कडे जाणूनबुजून  बदनापूर महसुल विभागाकडून कानाडोळा करण्यात येत असल्यामुळे शासनाचा लाखोचा महसुल बुडत असल्याचे निर्दनास येत आहे.  देशात सध्या कोरोना या संसर्गाने सर्व लाॕकडाऊन असल्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळते मात्र अवैद्य मुरुम उत्खनन ,  वाळू माफियाकडून लिलाव न होता सर्व नदीपात्रातुन अवैद्य वाळू उपसा ,  बदनापूर हद्दीतील खडी मशीनसाठी लागणारे दगड बिनदिक्कत पोकलॕन्डने फोडणे चालू असून खडी वाहतुक सुरु असल्याचे चित्र सोमठाणा परीसरात बघायला मिळत आहे .या सर्व वाहनांना नेमके डीझेल मिळते कुठून फक्त अत्यावश्यक वाहनांना डीझेल देण्यात यावे असे आदेश असताना जिल्हाअधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या पेट्रोल पंप चालकांना चाप बसणार का ?  मग हा कोरोनाचा लाॕकडाऊन फक्त कष्टकरी , शेतकरी , मोलमजूरी करणाऱ्या सामान्य जनतेसाठी आहे का ? कारण सर्व गरीब लोकांची घरकुलाची वाळू अभावी , खडी अभावी , मुरुमाअभावी बंद असताना लोकप्रतिसह , मोठ मोठ्या धनाढ्याचे कामे जोमात चालु असून जालना औरंगाबाद महामार्गाला लागून असलेल्या प्लाॕटींगवर मुरुमाचे ढिगच ढिग दिसतात तर वाळूचे पण ढिग दिसून येत असल्यामुळे याकडे महसुल विभागाचे अधिकारी , कर्मचारी याचांच मोठा हात असल्याचे बोलले जात आहे .पण प्रशासनाकडून जिल्हाभर कार्यवाही चालू असताना बदनापूर तालुक्यात एवढी मेहबानी का ? हाही एक मोठा प्रश्न आहे मग जिल्हाअधिकारी यांनी कार्यवाही करावी अशी मागणी सामान्य जनतेतुन होत आहे .