महाराष्ट राज्यात २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप - अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ , टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई ही करण्यात येईल


लोकतंत्र की आवाज़, चंद्रपुर न्यूज़ नेटवर्क

मुंबई, 09 अप्रैल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. १ ते ८ एप्रिल २०२० या आठ दिवसात राज्यातील १ कोटी ४० हजार ८२२ शिधापत्रिका धारकांना २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईही करण्यात येत आहे.