बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे कृषी सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न


लोकतंत्र की आवाज़,चंद्रपूर
जालना/बदनापुर/सागरवाडी, 24 मई (प्रतिनिधि):
बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे दिनांक 24 मई रोजी कृषी विभाग तर्फे सोयाबीन उगवण क्षमता तपासणी मोहीम आयोजित करण्यात आले होते. घरच्या सोयाबीन बियाणाचे उगवण क्षमता तपासून त्यानुसार बियाण्यांचे मात्रा वापरण्यात यावे. यासाठी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. घरचेच बियाणे वापरल्यामुळे उत्पादन खर्चात बचत होईल या उद्देशाने कृषी विभाग मार्फत ही मोहीम राबविण्यात आली. कृषी विभागामार्फत शेतकरीसाठी शेकडो योजना राबविण्यात येतात. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री एन आर कोकाटे, मंडळ कृषी अधिकारी श्री आर राठोड, कृषी पर्यवेक्षक श्री घुनावत, प्रशिक्षण अधिकारी डॉ कृषी सहायक चंद्रशेखर काकडे, कृषी सहायक गणेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते विशाल जारवाल सरपंच देवचंद बहूरे, करतात सुलाने,रामचंद सुलाने आदी शेतकरी उपस्थित होते.