महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव "दिपोत्सव"ने साजरा करा!, हिंदु महासभा व महाराणा ब्रिगेड चे आवाहन -धनसिंह सुर्यवंशी


लोकतंत्र की आवाज़,चंद्रपूर 
जालना / बदनापुर ,दि 8 मई (प्रतिनिधि): हिंदु सुर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव (9 मई ) रोजी 'दिपोत्सव'ने साजरा करुन शासन निर्णयाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन हिंदु महासभा व महाराणा ब्रिगेडच्या वतीने धनसिंह सुर्यवंशी यांनी केले आहे.
सालबादा प्रमाणे संपुर्ण भारत वर्षात 9 मई रोजी हिंदुसुर्य महाराणा  प्रतापसिंह जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो, परंतु कोरोना महामारीने संपुर्ण विश्व होरपळुन निघत असतांना घराबाहेर पडून आनंदोत्सव साजरा करणे भारतीय संस्कृतीची कुचेष्टा ठरेल. तसेच शासनाने वारंवार दिलेल्या सुचनेचेही पायमल्ली होईल. हा एक प्रकारे राष्ट्रद्रोह होय. याची जाणीव जागृती होणे गरजेचे असून घरात राहुनच या महायुध्दाचा मुकाबला करणे प्रत्येकाचे धर्मकार्य असून प्रत्येक सण उत्सव जयंत्या येणार्‍या काळात' न भुतो ना भविष्यती' पध्दतीने मोठ्या उत्साहात साजर्‍या करायच्या असतील तर सरकारने दिलेल्या जनहितार्थ सुचनांचे पालन करा. तसेच आरोग्य, पोलीस व स्वच्छता यंत्रणेतील देवदुतांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव दिनी सायंकाळी घराच्या गच्चीवर व घरात दिवे पेटवून जयघोषामध्ये दिपोत्सव साजरा करावा. असे आवाहन हिंदु महासभा व महाराणा ब्रिगेडच्या वतीने हिंदुशौर्य धनसिंह सुर्यवंशी यांनी केले आहे.