सागरवाडी येथे जीवघेणा पाऊस त्यामुळे नागरिका मध्ये भीति चे वातावरण

जालना/बदनापुर/सागरवाडी/,10 मई (प्रतिनिधि) : सागरवाडी ता.बदनापूर येथे आज दिनांक 10 मई रोजी जीवघेणा पाऊस आणि हवा आल्याने गावातील नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे संध्याकाळी 5 वाजता जीवघेणा अवकाळी पाऊस व वादान आले. या पाउसा मध्ये हवा जास्त असल्याने गावातील अनेक नागरिकांचे घरावरील पत्रे व भिंत पडली. व जनावरा चे खोटे पडले व झाडे व पिकांचे चांगले नुकसान झाले व वादान जास्त असल्याने छतावरील पत्रे उडाले व भिंत पडली.  या अवकाळी पावसामुळे सुमारे 20-25 गरीब नागरिकांच्या छतावरील पत्रे उडाले व भित पडल्याने नागरिका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.  दरम्यान सागरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल जारवाल यांनी शेजारील नागरिकांना त्यांच्या निवस्थानी बोलाऊन त्यांना पाऊस व हवा थांबे प्रयंत त्यांच्या घरी थामविले व शासनाने ज्या नागरिकांचे नुकसान झाले त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी या हेतूने त्यांनी गावात जाऊन पाहणी केली असता नुकसान झाल्याचे आढळून आल्याने त्यांनी तात्काळ नायब तहसीलदार शिंदे . तलाठी काकडे. व नेसर्गिक आपत्ती व्यवस्थापन च्या कर्मचारी शी संपर्क साधला असता त्यांनी पंचनामा करून योग्य ती कार्यवाही करू असे सांगितले.