गडचिरोली जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 40 वरून 14 वर , जिल्हयातील आणखी ६ जण कोरोनामुक्त


गडचिरोली ,05 जून (जिमाका) : आज जिल्हयातील आणखी सहा कोविड-19 रूग्णांना बरे झाल्यानंतर दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये एटापल्ली तालुक्यातील ४ रुग्ण व भामरागड - मुलचेरा येथील एक- एक रुग्णांचा समावेश आहे. आज सहा जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्हयातील एकुण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २५ झाली. तर सद्या १४ कोरोना बाधितांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. यापूर्वी एक जणाचा हैद्राबाद येथे दुदैवी मृत्यू झाला आहे. आज सहा जणांना दवाखान्यातून डीस्चार्ज देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे उपस्थित होते.