सागरवाडी येथे कृषी विभाग व एकात्मिक पाणलोट व्यवसथापन समिती मार्फत 40 शेतकरिंचे शेतात मोका तपासणी करण्यात आली



लोकतंत्र की आवाज़,चंद्रपुर
जालना /बदनापुर/ सागरवाडी , 07 जून :
बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे कृषी विभाग व एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन समिती मार्फत 2012 व 2013 मध्ये कडबा कुट्टी. मळणी यंत्र. खत कंपोस्ट. ठिबक सिंचन व तुषार सिंचनसाठी अनेक शेतकरी नें फॉर्म भरेले होते. त्या मधून 40 सागरवाडी येथील 40 लाभार्थी ची निवड करण्यात आली.. त्या पार्श्भूमीवर कृषी विभाग व एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन समिती मार्फत आज मोका तपासणी करण्यात आली असून सर्व शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अवजाराचे फोटो काढण्यात आले असून 30 जुन प्रयंत सर्व लाभार्थींच्या खात्यात नियमानुसार अनुदान जमा होईल असे पाणलोट व्यवस्थापन समिती कर्मचारी विनोद मावकर यांनी सामाजिक कार्यकर्ते विशाल जारवाल यांच्याशी बोलताना सांगितले. ही योजना 2012/13 ची असून 8 वर्षांनंतर लाभार्थी ना लाभ भेटणार असल्याने शेकऱ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी कृषी विभाग व एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन समिती चे आभार व्यक्त केले. या वेळी कृषी विभागाचे पर्यवेक्षक घुनावत, पाणलोट चे विनोद मावकर, सागरवाडी चे सामाजिक कार्यकर्ते विशाल जारवाल व रोजगार सेवक मचींद्र खरात, उत्तम दुल्हत व इतर लाभार्थी उपस्थित होते.