#Loktantrakiawaaz
चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगर पालिकाच्या (Chandrapur CMC) स्थायी समिती सभापती पदी भाजपचे संदीप आवारी (Sandip Awari) यांची निर्विरोध निवड करण्यात आली. 10 ऑक्टोम्बरला 4 वाजेपर्यंत सभापती (CMC Standing Comitee) पदासाठी एकही फॉर्म न आल्याने संदीप आवारी हे निर्विरोध निवडणूक जिंकले . याची अधिकृत घोषणा 11 ऑक्टोम्बरला होणार आहे . महिला व बालकल्याण समिती सभापती पदी भाजपच्या नगरसेविका पुष्पा उराडे व उप सभापती पदी शीतल आत्राम यांची निवड करण्यात आली आहे . विवेकनगर प्रभागातून पालिकेच्या निवडणूकित निर्विवाद वर्चस्व असलेले संदीप आवारी यांनी याआधी चंद्रपूर मनपाचे पहिले उपमहापौर म्हणून त्यांच्या नावाची नोंद आहे . चंद्रपुर मनपाच्या सभापती पदासाठी एकूण 9 अर्जाची उचल झाली होती मात्र वेळेवर एकही अर्ज आवारी यांच्या विरोधात आला नाही. नगरसेवक संदीप आवारी यांनी आपल्या यशाचे श्रेय माजी अर्थमंत्री महाराष्ट्राचे लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व भाजपचे ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर ( Hansraj Ahir) आणि भाजप नगरसेवक यांना दिले आहे.