चंद्रपुर ,19 जून (जिमाका) : कोरोना विषाणूंचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टसिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.लॉकडाऊन दरम्यान करण्यात आलेल्या उपाययोजना करिता केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता, खुले लॉन, नॉन एसी सभागृह व घराच्या परिसरामध्ये लॉकडाऊन दरम्यान 50 लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टनसिंग तसेच कोव्हीड संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आले असून याबाबतचा शासन निर्णय दोन दिवसात निर्गमित होत असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली