आज रविवारला चंद्रपुर जिल्हयात आणखी तीन पॉझिटीव्ह ,चंद्रपूर जिल्हातील बाधीताची संख्या ४७


 

चंद्रपुर ,14 जून (जिल्हा माहिती कार्यालय,चंद्रपुर):
चंद्रपूर शहरांमध्ये तुकूम परिसरात आणखी दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. बाधिताच्या संपर्कातील या दोन्ही महिला आहेत. 

तर ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह बाधिताच्या संपर्कातील तळोधी खुर्द येथील आणखी एक नागरिक बाधित आढळून आला आहे. 

रविवारी तीन नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४७ झाली आहे.

       जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमित्रा नगर, तुकुम परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रातील बाधीत रुग्णाची ४७ वर्षीय पत्नी व ३० वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोघींची प्रकृती स्थिर आहे.

   दुसरा २० वर्षीय युवक अड्याळ टेकडी येथील बाधितांच्या संपर्कातील आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथील या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

    चंद्रपूरमध्ये आतापर्यत
 २ मे ( एक बाधीत ), 
१३ मे ( एक बाधीत) 
२० मे ( एकूण १० बाधीत ) 
२३ मे ( एकूण ७ बाधीत ) व 
२४ मे ( एकूण बाधीत २ ) 
२५ मे ( एक बाधीत ) 
३१ मे ( एक बाधीत )
 २जून ( एक बाधीत ) 
४ जून ( दोन बाधीत ) 
५ जून ( एक बाधीत ) 
६जून ( एक बाधीत ) 
७ जून ( एकूण ११ बाधीत )
 ९ जून ( एकूण ३ बाधीत ) 
१०जून ( एक बाधीत ) 
१३ जून ( एक बाधीत ) आणि
 १४ जून ( एकूण ३ बाधीत ) 

अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४७ झाले आहेत.आतापर्यत २४ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. 

त्यामुळे ४७ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता २३ झाली आहे.