महाराणा ब्रिगेड संघटनेच्या बदनापुर तालुका उपाध्यक्षपदी मंगेश राजपूत यांची नियुक्तीजालना / बदनापूर दि 09 जून:  महाराणा ब्रिगेड संघटनेच्या बदनापुर तालुका उपाध्यक्षपदी मंगेश राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली सदरील नियुक्ती महाराणा ब्रिगेड चे जालना जिल्हा अध्यक्ष सुकलालजी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली, बदनापूर तालुका अध्यक्ष अरुण खोकड राजपूत यांच्या वतीने करण्यात आली.

बदनापूर तालुक्यातील ग्रामीण भागात महाराणा ब्रिगेड च्या संघटनेचे कार्य वाढीसाठी तसेच समाज बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी सदरील नियुक्ती देण्यात आल्याचे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले.

मंगेश राजपूत यांच्या सोबत गजानन बहुरे, आकाश बहुरे, गणेश  जारवाल, विकास बहुरे, राजु बहुरे, प्रताप चुगडे, पुनम जारवाल, गोपाल जारवाल, शंकर चुगडे, ताराचंद बहुरे, कपुरचद बहुरे, किसन बमहणात, सुनिल बहुरे, अर्जुन बमहणात, संजय जारवाल, गणेश बहुरे, सुरज बमहणात, महेंद्रसिगं बहुरे, हिरालाल जारवाल, चंपालाल जारवाल, किसन बहुरे, अर्जुन बहुरे, पवन चराडे, गजानन वैष्णव, लक्षमन वैष्णव, जयराज जारवाल, रंजित जारवाल, पुनम जारवाल, विजय जगरवाल, झनक जगरवाल, ई. कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष सुकलालजी राजपूत व तालुकाध्यक्ष अरुण भाऊ खोकड राजपूत यांच्या वर विश्वास ठेवून व नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष मंगेश राजपूत यांच्या सोबत महाराणा ब्रिगेड मध्ये सक्रीय कार्य करण्यासाठी प्रवेश केला.
महाराणा ब्रिगेड च्या सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच समाजबांधवांच्या वतीने नवनिर्वाचितांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.