बदनापुर तालुक्यातील सागरवाडी येथील रस्ताचे काम अर्धवट झाल्याने प्रवाशांना येजा करण्यासाठी त्रास


जालना / बदनापुर , 26 जुन : बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे गेल्या काही महिन्यांपासून सागरवाडी फाटा ते सिरजगाव घाटी रोड चे काम सुरू झाले होते. दरम्यान काही दिवसापासून काम रखडल्याने सिरजगाव घाटी लगत असलेल्या पुलाचे काम देखील अर्धवट झाले असून फक्त गड्डा खोदून ठेवले असल्याने पावसाळा चालू झाला असून पाऊस पडल्याने तेथे पाणी जमा झाले असून तिथे  वाहन जाण्यास त्रास होत आहे. दरम्यान खरीप हंगाम ची लागवड झाली असून शेतकरी खते.बिया. व इतर शेतीचे कामासाठी शेतकरी ला ट्रॅक्टर, पीक अप तसेच इतर वाहन घेऊन जावे लागते परंतु हा अपूर्ण पुलामुळे रस्ता बंद पडला असून बाजूला असलेल्या खड्ड्यातून शेतकरी व इतर नागरिकाला त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने या कडे योग्य लक्ष देऊन पुलाची व्यवस्था करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून व इतर शेतकरी नागरिक कडून होत आहे. या वेळी सागरवाडी येथील माझी सरपंच अंबरसिंग बहूरे, विशाल जारवाल, मनुसिंग बहुरे, विठल बहूरे, प्रताप बमनावत,खुशाल बहुरे, रामदास बहूरे, केसरसिंग बहूरे, चरण बमनावत , अजय खोकड व इतर नागरिक उपस्थित होते.