चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी सप्टेंबर महिन्यात उठवणारच : नामदार विजय वडेट्टीवार


चंद्रपुर / चिमूर ,20 जून (प्रतिनिधि) : येत्या काही दिवसात शासकीय स्तरावरील समित्या मध्ये  महाविकास आघाडी तील पक्षातील पदाधिाऱ्यांनीही विश्वासात घेवून सामावून  लवकर समित्या गठीत  करणार असल्याचे सांगत नामदार विजय वडेट्टीवार म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी असताना महापूर आहे. 

दारू बंदी असल्याने बोगस दारू मुळे आरोग्य धोक्यात येत असून शासनाचा महसूल बुडत आहे.जिल्ह्यातील दारू बंदी उठवायची होती परंतु सध्यस्थीतीत कोरोना कोविड-19 महामारी असल्याने दारू बंदी उठविण्यास विलंब होत असले तरी येत्या सप्टेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील दारू उठविणार असल्याचे ठाम सांगत आपण कोणत्याही आंदोलनास घाबरनार नसल्याचे सुद्धा सांगितले .
            ग्रामगीता महाविद्यालय चिमूर भेट दरम्यान  पालकमंत्री विजय वड्डेटीवार बोलत होते . यावेळ काग्रेस जिल्हा सरचिणीस तथा जीप सदस्य गजानन बुटके, सहकार नेते संजय डोंगरे, सरपंच रामदास सहारे, नप उपाध्यक्ष तुषार शिंदे, मनीष नंदेश्वर , प्रा राम राऊत , राजू लोणारे, प्रमोद दांडेकर, सुनील दाभेकर, माजी पस सदस्य ओम खैरे ,तसेच एस डी ओ संकपाल ,ठाणेदार धुळे, सिओ खेवले , प्राचार्य धम्मणी उपस्थित होते .

     दरम्यान नामदार विजय वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी कार्यकर्त्यांच्या समस्येवर चर्चा केली बरेच कार्यकर्ते उपस्थित होते .