रविवारी एकाच दिवशी ११ कोरोना बाधीत चंद्रपूर जिल्हातील बाधीताची संख्या पोहचली ३९ वर


चंद्रपुर 07 जून :
    चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रविवारी दिनांक ७ जून रोजी एकाच दिवशी ११ कोरोना पॉझिटीव्ह आढळले. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ३९ झाली आहे. 

यामध्ये मुंबईवरून आलेला शास्त्री नगर चंद्रपूर येथील ३१ वर्षाच्या पुरुष , नवी दिल्लीवरून गडचांदूर येथील २७ वर्षाचा व्यक्ती, जळगाववरून आलेला नागभीड तालुक्यातील तळोधी येथील ३६ वर्षाचा व्यक्ती, यवतमाळ वरून आलेला नागभीड तालुक्यातील पूनघाडा रिठ या गावचा ३६ वर्षीय व्यक्ती, ओडीसा राज्यातून आलेला नागभीड तालुक्यातील विजापूर या गावचा चाळीस वर्षीय पुरुष, तसेच यवतमाळ येथून आलेला नागभिड शहरातील ४५ वर्षाचा पुरुष, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्ती सह ब्रह्मपुरी येथील covid-19 केअर सेंटर मधील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या एकूण पाच व्यक्तींचा समावेश आहे. 

यापैकी अडयाळ टेकडी येथील संपर्कातील दोघांना वगळता अन्य ३ नागरिकांमध्ये मुंबईवरून आलेला ४३ वर्षाचा व २७ वर्षाचा पुरूष आहे.तर गुजरात मधून आलेला कूड़े सावली येथील एक व्यक्ती आहे.

    चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत )


 • १३ मे ( एक बाधीत)
 •  २० मे ( एकूण १० बाधीत )
 •  २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व 
 • २४ मे ( एकूण बाधीत २ ) 
 • २५ मे ( एक बाधीत ) 
 • ३१ मे ( एक बाधीत ) 
 • २जून ( एक बाधीत ) 
 • ४ जून ( दोन बाधीत ) 
 • ५ जून (एक बाधीत )
 •  ६जून ( एक बाधीत )
 •  ७ जून ( एकूण ११ बाधीत )

अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ३९ झाले आहेत.आतापर्यत २२ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे.
 त्यामुळे ३९ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता १७ आहे.