बंदर कोळसा ब्लॉक लीलाव रद्द करण्याची पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचेकडे इको-प्रो ची मागणी


मा. पंतप्रधान, मा. मुख्यमंत्री, केंद्रीय पर्यावरण मंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत पाठविले निवेदन

चंद्रपूर 24 जून : ताडोबाच्या बफर सिमेस लागून बंदर कोळसा ब्लॉक लीलाव रद्द करण्यात यावे या मागणी करिता वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे.  याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी यांचे मार्फत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावड़ेकर यांना लीलाव रद्द करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले तर राज्य सरकार च्या वतीने या प्रकरण मधे हस्तक्षेप करित केंद्र सरकार कड़े लीलाव रद्द करण्याची मागनीचे पत्र मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे कड़े इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी केली आहे. यावेळी इको-प्रोचे अमोल उत्तलवार, राजू काहीलकर व सचिन धोतरे उपस्थित होते.