सूडबुद्धीने दिव्यमराठीवर दाखल केलेल्या गुन्ह्याचा घनसावंगी पत्रकार संघाकडून तीव्र निषेध


घनसावंगी , 30 जून :(प्रतिनिधी)
 अधिकाऱ्यामधील समन्वयाचा अभाव आणि "इगो"मुळे औरंगाबादमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली. याविषयी दैनिक दिव्यमराठीच्या विभागीय आवृत्तीमध्ये २०६ नागरिकांचे मारेकरी कोण ? आणि नापासांची फौज; निर्णय घेण्यास कोण कुठे चुकले ? या मथळ्याखाली सविस्तर बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या बातम्या चुकीच्या आहेत. असे कारण सांगत दिव्यमराठीचे संपादक, प्रकाशक, आणि सम्बधित वार्ताहर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे म्हणजे प्रसारमाध्यमांची गळचेपी करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रशासनाचा केविलवाणा प्रयत्न आहे. सत्य जगासमोर मांडण्याचा प्रसारमाध्यमांचा हक्क हिरावण्याचा हा बेजबाबदारपणाचा प्रयत्न आहे. 

याचा घनसावंगी तालुका मराठी पत्रकार संघातर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करून दाखल केलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी घनसावंगीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष बिडे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य रमेश बोबडे, तालुका मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस नरेंद्र जोगड, सर्जेराव गिर्हे, अशोक खेत्रे, रवींद्र बोबडे, सतीश केसकर, नजीर कुरेशी,  आसालम कुरेशी आकेफ, दिगंबर गुजर, तुकाराम शिंदे, विष्णुदास आर्दड, कंनूलाल विटोरे, तुळशीदास घोगरे, अविनाश घोगरे, संतोष गबाळे, लक्ष्मीकांत कुलकर्णी, अशोक घुमरे, परवेजखान पठाण, सय्यद युनुस, विष्णू व्यवहारे, अजय गाढे, गणेश ओझा, सुरेश दाड, प्रल्हाद साळवे, महादेव जगदाळे, बाबासाहेब तेलगड, भरत साबळे, प्रेमसिंग पवारा, भागवत बोटे आदींची नावे आहेत.