लवकरच दारू बंदी उठविन्यात येणार -पालकमंत्री विजय वडेटटीवार

चंद्रपूर 24 जून : स्थानिक नियोजन भवन येथे आज दुपारी  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद पार पडली.यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या रखडलेल्या ग्रामसभा घेण्याचा मोठा निर्णय घेतला.ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा रखडल्यामुळे गावांचा विकास खोळंबला आहे. आणि गावांचा विकास खोळंबु नये म्हणून सुरक्षित अंतर पाळून व नियमांचे पालन करून ग्रामसभा घेण्यात याव्या असे निर्देशहि त्यांनी दिले. तसेच लवकरच दारू बंदी उठविन्यात येणार आहेत. काही ही होवो लोकांचा विरोध झाला तरी चालेल. पन दारू चालू करणारच असे ठळकपने सांगितले. मागील 15 दिवसात 8 कोटि ची दारू पकड़ण्यात आलेली आहेत. अर्थात 15 दिवसात 60 कोटि ची दारू आली असावी? पोलिसांनी दारू ची कडक कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहे . इलेक्ट्रिक बिल विषयी उदया कैबिनेट ला विषय ठेवण्यात येणार आहेत लोकांना लवकरच गोङ बातमी मिळणार. असे त्यांनी सांगितले.