पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्‍या स्‍वप्‍नातील आत्‍मनिर्भर भारत घडविण्‍यासाठी आशिर्वाद द्या – आमदार सुधीर मुनगंटीवार , केंद्र सरकारच्‍या वर्षपुर्ती निमित्‍त संपर्क अभियानाचा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात चंद्रपूर शहरात शुभारंभ


 

महाराष्‍ट्रातील 2 कोटी 75 लक्ष मतदारांनी नरेंद्रभाई मोदी यांना दुस-यांदा पंतप्रधान केले. गरिबांच्‍या कल्‍याणासाठी, देशहीतासाठी मोदीजींनी अनेक योजना अमलात आणल्‍या. त्‍या योजनांची माहीती गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्‍याचा उपक्रम 1 जुन पासुन सुरु झाला आहे. 

 पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी म्‍हणजे ख-या अर्थाने विकासयोध्‍दा आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्‍यासाठी काहीतरी वेगळे करण्‍याची उर्मी त्‍यांच्‍यात आहे. नरेंद्रभाईंच्‍या नेतृत्‍वात देशात दुस-यांदा सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर धारा 370 रद्द झाले. अयोध्‍देत प्रभु श्रीरामचंद्राच्‍या मंदीराच्‍या निर्माणाचे भारतवासीयांचे स्‍वप्‍न पुर्ण झाले. 

नागरिकता संशोधन कायदा लागु झाला. आर्थिक सुधारणांना गती देण्‍यात आली. भारताला आत्‍मनिर्भर बनविण्‍यासाठी या द्रष्‍टया नेत्‍याने राष्‍ट्रव्‍यापी अभियान हाती घेतले. कोरोनाच्‍या महामारीच्‍या जागतीक संकटाचा सामना करताना आपल्‍या ओजस्‍वी कामगीरीने जगाला दिशा दाखविण्‍याचे काम पंतप्रधान नरेंद्रभाईंच्‍या नेतृत्‍वात भारताने केले आहे. 

नरेंद्रभाई मोदी यांच्‍या स्‍वप्‍नातील आत्‍मनिर्भर भारत घडविण्‍यासाठी आशिर्वाद द्यावा असे आवाहन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्‍या दुस-या टर्मच्‍या प्रथम वर्षपुर्ती निमित्‍त भाजपा तर्फे आयोजित संपर्क अभियानाचा शुभारंभ 12 जुन रोजी चंद्रपूर शहरातुन करण्‍यात आला. 

सोशल डिस्‍टंसिंगचे काटेकोरपणे पालन करत आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात या अभियानाचा श्रीगणेशा झाला. चंद्रपूरातील नगीनाबाग परिसरात राहणारे आंबेडकरी चळवळीतील ज्‍येष्‍ठ नेते, लेखक प्रा. डॉ. इसादास भडके यांच्‍या घरी भेट देत त्‍यांच्‍या कुटूंबियांशी आ. मुनगंटीवार यांनी संवाद साधला. 

यावेळी मोदी सरकारच्‍या गेल्‍या 5 वर्षाच्‍या कारकिर्दीतील निर्णयांची माहीती त्‍यांनी यावेळी दिली. स्‍वदेशीला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या पावलावर पाऊल ठेवत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची वाटचाल सुरु आहे. 

ग्रामआधारीत अर्थव्‍यवस्‍था, कृषी क्षेत्र, ग्रामोद्योग, लघुउद्योग, कुटीर उद्योग यांना चालना देण्‍यासाठी त्‍यांनी उचललेली पावले अतिशय महत्‍वपुर्ण आहेत. स्‍वदेशी आणि स्‍वावलंबनाचा नारा देत देशाचा आत्‍मा नरेंद्रभाईंनी जागृत केला आहे. 

वोकल फॉर लोकल हे सुत्र सांगत स्‍थानिक उद्योजकांना प्रोत्‍साहन व स्‍थानिक नागरिकांना रोजगाराच्‍या संधी देण्‍याचे मोठे काम त्‍यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजना, किसान पेन्‍शन योजना, लघु व्‍यापारीक मानधन योजना, हर घर जल योजना अशा विविध योजनांच्‍या माध्‍यमातुन सर्व घटकांना दिलासा देणारे निर्णय त्‍यांनी घेतले.

 देशाच्‍या इतिहासात मोदीजींच्‍या नेतृत्‍वातील हे 6 वर्ष सुवर्णाक्षरात नोंदविले जाणार आहेत. गेल्‍या 1 वर्षात जे महत्‍वपुर्ण निर्णय त्‍यांनी घेतले हे सर्व घटकांसाठी कल्‍याणकारी आहेत. जागतिक मंचावर RCEP चा विरोध करत मोदी सरकारने देशातील शेतकरी व छोटया व्‍यावसायींकाच्‍या हिताला व सुरक्षेला प्राधान्‍य दिले. 

आर्थिक सुधारणांकडे वाटचाल करत 10 सरकारी बँकांचे विलनीकरण करत 4 मोठया बँका बनविण्‍याचे महत्‍वपुर्ण पाऊल त्‍यांनी उचलले. सोबतच बँकांसाठी 55,250 कोटीच्‍या बेलआउट पॅकेजची घोषणा त्‍यांनी केली. सर्वेपी सुखीनः संतु सर्वे निरामयः या उक्‍तीनुसार कोरोनाच्‍या महामारीच्‍या काळात त्‍यांनी घेतलेले निर्णय या देशाला सुरक्षा कवच प्रदान करणारे ठरले.

 पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी या देशाचे भुषण असल्‍याचे प्रतिपादन आ. मुनगंटीवार यांनी बोलताना केले. यावेळी मोदी सरकारच्‍या विविध उपलब्‍धींची प्रकाशने, जिल्‍हयात झालेल्‍या विकासकामांची माहीती, कोरोनाशी लढतांना घ्‍यावयाच्‍या खबरदारीच्‍या उपाययोजनांची माहीती देणारी पत्रके त्‍यांनी प्रा. इसादास भडके यांना भेट दिली. या उपक्रमाचे कौतुक करत प्रा. भडके यांनी आ. मुनगंटीवार यांना व भाजपा पदाधिका-यांना शुभेच्‍छा दिल्‍या.

यावेळी भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस देवराव भोंगळे, चंद्रपूरच्‍या महापौर सौ. राखी कंचर्लावार, चंद्रपूरचे उपमहापौर राहुल पावडे, नगरसेवक संजय कंचर्लावार, संदिप आवारी, रवी आसवानी, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, दत्‍तप्रसन्‍न महादाणी यांची उपस्थिती होती.

त्‍यानंतर नेहरु नगर परिसरात काही कुटूंबियांची भेट घेत आ. मुनगंटीवार यांनी मोदी सरकारच्‍या कामगीरीची माहीती देत पत्रके वितरीत केली. यावेळी नगरसेवक सौ. वनिता डुकरे, शितल गुरनुले, विठ्ठलराव डुकरे, रवी गुरनुले, सोपान वायकर, रत्‍नमाला वायकर आदींची उपस्थिती होती.