सागरवाडी येथे कृषी विभामार्फत मोफत मक्का बियाणाचे वाटप


जालना / बदनापुर , 17 जून : बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे कृषी विभाग बदनापूर मार्फत शेतकऱ्याना मक्का या बियाणाचे वाटप करण्यात आले. गेल्या वर्षा मध्ये मक्का या पिकावर लष्करी अळी सारख्या किडी च्या प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरीचे मक्का या पिकाचे खर्च सुद्धा मिळाला नव्हता. म्हणून कृषी विभागाने शेतकऱ्या साठी मक्का पिकाचे नुकसान होऊ नये व त्याच्यावर लष्करी अळीच्या प्रादुर्भाव होऊ नये या उद्देशाने त्यांच्या कडूनच मक्का या पिकाचा बियाणाचे वाटप सागरवाडी गावात केली. या वेळी कृषी विभागा चे मंडळ कृषी अधिकारी राठोड, पर्यवेक्षक घुणावत, कृषी सहायक जाधव, सरपंच देवचंद बहुरे, उप सरपंच डॉ. केसरसिंग बहुरे, माझी सरपंच अंबरसिंग बहूरे, खुशालसिंग खोकड, शामसिंग बहुरे, विशाल जारवाल ,अजय खोकड, राहुल बहूरे, शेखलाल शेख, रामू कटारे, कचरू जारवाल इतर शेतकरी उपस्थित होते.