सागरवाडी येथील सातबारा वर नोंद असलेल्या गायरान जमीन धारकांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या- विशाल जारवाल यांची निवेदना द्वारे तहसीलदारांना मागणी

 सागरवाडी येथील सातबारा वर नोंद असलेल्या गायरान जमीन धारकांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या- विशाल जारवाल यांची निवेदना द्वारे तहसीलदारांना मागणी.
बदनापुर / सागरवाडी ,15 जुलाई :बदनापूर तालुक्यातील मौजे सागरवाडी शिवारात गट क्रमांक 334 मध्ये 90 हेक्टर 20 आर एवढी शेतजमीन अस्तित्वात असून प्रस्तुत सातबारा वरील मालकी रकान्यात नामनोंद असलेल्या सर्व शेतकरीनीं अतिशय गरीब हलाखीची जीवन व्यथित केले आहे व करत असल्याने त्या काळात आपली उपजीविका भागविण्याची त्यांना कोणतेही पर्यायी मार्ग नसल्याने त्यांनी प्रस्तुत गटावर कास्त करून. वहिती करून मशागत केली व त्या वेळेपासून ते आजपावेतो कास्त मशागत करून आपली व कुटुंबाची उपजीविका भागवत आहे. सदर शेतीवर अनेक कुटुंब अवलंबून असून त्या काळात आपली शेतजमीन आपल्या नावे यावी म्हणून तथा सातबारा उताऱ्यावर नोंद व्हावी म्हणून रीतसर कार्यवाही केली व त्या कार्यवाहीस अनुसरून संबधित शासनाने त्यांची योग्य चौकशी करून वस्तुस्थिती अहवाल पाहून पंचनामे करून त्यांच्या वहिती नोंदीसंह त्यांची सातबारा उताऱ्यात नोंद केली आहे. भोगवट दार वर्ग 2 असे सातबारा वर नोंद करून पारित केला. तसेच त्यांना इतर शेतकऱ्या प्रमाणे कायदेशीर दर्जा प्राप्त झाला आहे. प्रस्तुत सर्व शेतकरी केवळ उपजीविका भागवणे साठी उपाय योजना म्हणून वापरत आहे. परंतु त्यांना सुद्धा इतर शेतकरी प्रमाणे आज रोजी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यांची कुटुंब सुद्धा आर्थिक परिस्थितीशी झुंज देत आहे. तसेच वातावरणाच्या अनियमितपणामुळे त्यांच्या पिकांना देखील नुकसानीची झळ पोहचत आहे. आर्थिक रित्या सर्व शेतकरी वर्ग दुर्बल असल्याने त्यांना बी. बियाने , पेरणी साठी, शेतीची मशागतीसाठी, उत्पन्न वाढीसाठी लागणारा खतासाठी, व इतर खर्च अशा सर्व बाबीसाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. त्यांना शेतकरीचां दर्जा प्राप्त झाला असून इतर शेतकरी प्रमाणे कोणतेही वित्त संस्था, बँक पिकासाठी आर्थिक मदत करत नाही तथा कर्ज देत नाही. जेव्हा की ते सुद्धा शेतकरी आहे व सर्व कायद्याच्या चौकटीत राहून, बँकेने दिलेल्या कर्जाच्या संपूर्ण अटीचे पालन करून हप्ते पेडण्याच्या हमिसह कर्ज मिळणे करिता गरजू व उस्तुक आहे. परंतु या गरीब शेतकऱ्यंना कोणतेही बँक पीक कर्ज देण्यास तयारी दाखवत नाही. कोरोना संसर्गाचे गंभीर परिस्थीतीत इतर बाहेर ठिकाणी लॉक डाऊन परिस्थीती त पूर्ण रोजगार ठप्प झालेली आहे. तसेच दैनिदिन जीवन जगणे अडचणीचे होऊन बसले आहे. त्यातच जीवन जगण्याचे एकमेव साधन म्हणजे शेती असल्याने व संबधित बँका पीक कर्ज देत नसल्याने संपूर्ण शेतकरी ना शेती कशी कसायची व चरितार्थ कसा भागवयाचा हा गंभीर प्रश्न होऊन बसला आहे. याची योग्य काळजी घेऊन या शेतकरी ना शासकीय नियमानुसार व अटीनुसार पीककर्ज उपब्ध करून द्यावे असे विशाल जारवाल यांनी निवेदनात म्हटले आहे.या वेळी सामाजिक कार्यकर्ते विशाल जारवाल ,अजितसिंग खोकड, दारासिंग खोकड, उत्तम दुल्हत, प्रताप कवाले व इतर शेतकरी नागरिक उपस्थित होते.