छोटुभाई पटेल हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थि सत्कार

छोटुभाई पटेल हायस्कूल येथे गुणवंत विद्यार्थि सत्कार

चंद्रपूर, 30 जुलाई (का प्र): चंद्रपूर येथील स्थानिक छोटुभाई पटेल हायस्कूल चा शालान्त परिक्षेचा निकाल 98.36 % लागला . नेहमी प्रमाणे शाळेने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखून यश संपादन केले . शाळेतील १0 व्या ' ब ' वर्गाचा विदयार्थी राज विजय खानके याने 97 % गुण प्राप्त करून शाळेतून पहिला येण्याचा मान पटकावला , अभय रमेश वोमेनवार हा विदयर्थी 84.20 % गुण प्राप्त करून शाळेतून व्दितीय व कु . आकंक्षा बंडूजी बोडे 88.80 % गुण प्राप्त करून तृतीय आली . आदर्श शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष मा . लोटी पटेल आदर्श शिक्षण मंडळातर्फे सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले . शाळेतील मुख्याध्यापिका सौ सवाणे मॅडम , उपमुख्याध्यापिका सौ परिहार मॅडम , पर्यवेक्षक  मानकर सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनाही सर्व विदयार्थ्यांचे अभिनंदन केले .