अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण, खासदार नवनीत राणा यांच्या मुलगी आणि मुलासह कुटुंबातील 10 जण पॉझिटिव्ह

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण, खासदार नवनीत राणा यांच्या मुलगी आणि  मुलासह कुटुंबातील 10 जण पॉझिटिव्ह
अमरावती , 06 अगस्त : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण, खासदार नवनीत राणा यांच्या 7 वर्षीय मुलगी आणि 4 वर्षीय मुलासह कुटुंबातील 10 जणांचा अहवाल आला होता पॉझिटिव्ह.

      खासदार नवनीत राणा यांनी स्वता सोशल मीडिया वर ही माहिती दिली.
      त्यांनी म्हटले की माझी मुलगी व मुलगा असे दोघेही व इतर कुटुंबीय कोरोनाग्रस्त झाले , एक आई म्हणून यांची काळजी घेणे माझे आद्यकर्तव्य होते.मुलामुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी घेता - घेता मला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी - घरीच राहा - सुरक्षित राहा , शासन निर्देशांचे पालन करा असे आवाहन करत असतांनाच आपले आशीर्वाद व सदिच्छा यांचे बळावर आम्ही कोरोनावर मात करू अशी मला आशा आहे .