चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोना चा महाविस्फोट , आज आता पर्यन्त चे 24 तासात सर्वाधिक 132 रुग्ण बाधित, आज कोरोना ने 2 मृत्यु, बधितची एकूण संख्या 1799 #Covid-19 #CoronaChandrapur

चंद्रपूर,27 अगस्त :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1799 झाली आहे. गेल्या 24 तासात 132 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 1081 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 696 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 1081 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 22 सह एकूण 19 कोरोना (चंद्रपूर जिल्हा) बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पहीला मृत्यु : मौलाना आझाद वार्ड बल्लारपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला श्वसनाचा व अस्थमाचा त्रास तसेच न्युमोनिया असल्याने दिनांक 24 ऑगस्टला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले . 26 ऑगस्टला सकाळी 5:30 वाजता अॅन्टीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला होता . पुढिल उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले . बाधिताला कोरोनासह श्वसनाचा , अस्थमाचा त्रास तसेच उच्चरक्तदाब , न्युमोनिया असल्याने 26 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला . 

दुसरा मृत्यु : आज 27 ऑगस्टच्या पहाटे दिड वाजता 60 वर्षीय पठाणपुरा वॉर्ड चंद्रपूर येथील बाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे . कोविड केअर सेंटर वन अकादमी येथून 25 ऑगस्टला दुपारी 3 वाजता श्वसनाचा त्रास असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले . वैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करूनही 27 ऑगस्टच्या पहाटे दीड वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाधिताचा मृत्यू झाला.या बाधिताला न्युमोनिया तसेच श्वसनाचा व मधुमेहाचा आजार होता . ( गेल्या 24 तासातील है दोन मृत्यु आहेत )