ब्रम्हपुरी तालुक्यातून 28 बाधित आले पुढे
आतापर्यत एकूण बाधितांची संख्या 749
426 बरे ;321 बाधितांवर उपचार सुरू
चंद्रपूऱ दि. 6 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 67 रुग्ण पुढे आले आहे. आज सर्वाधिक बाधित हे ब्रह्मपुरी तालुक्यातील आहे. या एकाच तालुक्यातून 28 बाधित पुढे आले आहे. बहुतेक बाधित हे 19 ते 40 वयोगटातील असून परस्पराच्या संपर्कातून पुढे आले आहेत. 321 बाधितावर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. 426 बाधित जिल्ह्यात आतापर्यंत बरे झाले आहेत.
काल रात्री सात वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये 682 रुग्ण पुढे आले होते. त्यामध्ये आज 67 रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या 749 झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसू शकते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाचणी सुरू असून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बाधितांची संख्या अधिक आहे.
नागरिकांनी शारीरिक अंतर पाळणे अत्यंत आवश्यक असून जिल्ह्यात संपर्कातील बाधिताची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आज पुढे आलेल्या बाधितामध्ये ब्रह्मपुरी येथील 28, बल्लारपूर येथील 13, चंद्रपूर येथील 13, चिमूर येथील 4, भद्रावती येथील 3, वरोरा येथील 3, गडचांदूर येथील 2, व राजुरा येथील एक अशा 67 बाधिताचा समावेश आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली, देलवंडी, गांगलवाडी आदी गावातून मोठ्या प्रमाणात परस्परांच्या संपर्कातून कोरोना पॉझिटिव्ह पुढे आले आहेत नागरिकांनी शारीरिक अंतर राखावे,कोरोना आजाराला गृहीत धरू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे. रुग्ण संख्या नियंत्रित करण्यासाठी रस्त्यावरील नागरिकांची संख्या कमी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन पुन्हा पुन्हा जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
जिल्ह्यात 9 हजार 973 नागरिकांची अँन्टीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 83 पॉझिटिव्ह असून 9 हजार 890 निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 91 हजार 388 नागरिक दाखल झालेले आहेत. जिल्ह्यामध्ये 1 हजार 244 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 1 हजार 567 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहेत.
वयोगटानुसार कोरोना बाधितांची संख्या:
जिल्ह्यात गुरूवार सायंकाळी 746 बाधित पुढे आले आहेत. यापैकी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 14 बाधित, 6 ते 18 वर्ष वयोगटातील 53 बाधित, 19 ते 40 वर्षे वयोगटातील 463 बाधित, 41 ते 60 वर्षे वयोगटातील 183 बाधित, 61 वर्षावरील 33 बाधित आहेत. तसेच एकूण 746 बाधितांपैकी 536 पुरुष तर 210 बाधित महिला आहे.
राज्याबाहेरील, जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या:
गुरूवार सायंकाळी 746 बाधितांपैकी जिल्ह्यातील 650 बाधित असून जिल्ह्याबाहेरील 42 बाधित आहेत. तर राज्याबाहेरील बाधितांची संख्या 54 आहे.
जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन विषयक माहिती:
जिल्ह्यात सध्या 73 कंटेनमेंट झोन सुरू आहेत. तर 83 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या 83 कंटेनमेंट झोनचा सर्वेक्षण अहवाल पुढीलप्रमाणे आहे. 340 आरोग्य पथकाद्वारे 15 हजार 130 घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकूण सर्व्हेक्षित लोकसंख्या 60 हजार 532 आहे.