बल्लारपुर 10 नागरिक कोरोना पॉजिटिव, आज एकूण बधित 39,
4 नागरिकांचा कोरोना ने मृत्यु,
आतापर्यत एकूण बाधितांची संख्या 816
466 बरे ; 346 बाधितांवर उपचार सुरू
चंद्रपूऱ दि. 08 ऑगस्ट (जिला माहिती कार्यालय) : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या आज 3 वाजे पर्यन्त नवीन 816 रुग्ण पुढे आले आहे. 336 बाधितावर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. 466 बाधित जिल्ह्यात आतापर्यंत बरे झाले आहेत.
काल रात्री सात वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये 25 रुग्ण पुढे आले होते. त्यामध्ये आज 39 रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या 816 झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसू शकते.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाचणी सुरू असून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बाधितांची संख्या अधिक आहे. नागरिकांनी शारीरिक अंतर पाळणे अत्यंत आवश्यक असून चंद्रपूर जिल्ह्यात संपर्कातील बाधिताची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आज शुक्रवारी नवीन 39 कोरोना रुग्ण समोर आले आहे त्यामध्ये सर्वाधिक चंद्रपूर महानगरतील -20 , बल्लारपुर- 10 चंद्रपूर ग्रामीण -2 , ब्रह्मपुरी-3 , कोरपना-1, वरोरा-1, मूल-2 अशे एकूण 39 समोर आहे आणि आतापूर्यन्त चंद्रपूर मध्ये - 4 लोकांचे मृत्यु झाले आहे.