चंद्रपूर जिल्ह्यात मध्ये आज 6 वाजे पर्यन्त नवीन 46 कोरोना पॉझिटीव्ह, आता पर्यन्त जिल्ह्यातील 6 नागरिकांचा मृत्यु, आतापर्यत एकूण बाधितांची संख्या 944, 561 बरे ; 375 बाधितांवर उपचार सुरू #ChandrapurCorona

चंद्रपूर जिल्ह्यात मध्ये आज 6 वाजे पर्यन्त नवीन 46 कोरोना पॉझिटीव्ह,

आता पर्यन्त जिल्ह्यातील 6 नागरिकांचा मृत्यु,

आतापर्यत एकूण बाधितांची संख्या 944
561  बरे ; 375 बाधितांवर उपचार सुरू
 
लोकतंत्र की आवाज़, न्यूज़ नेटवर्क, चंद्रपूर
चंद्रपूऱ दि. 12 ऑगस्ट (जिला माहिती कार्यालय) : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये  आज 6 वाजे पर्यन्त नवीन 46  रुग्ण पुढे आले आहे. 375 बाधितावर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. 561  बाधित जिल्ह्यात आतापर्यंत बरे झाले आहेत.

     काल रात्री सात वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 26 रुग्ण पुढे आले होते. त्यामध्ये आज 46 रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या 944 झाली आहे. आता पर्यन्त जिल्ह्यातिल 6 नागरिकांचा  मृत्यु झाले आहे आणि 2 मृत्यु जिल्ह्य बाहेरिल नागरिक 1 तेलंगाना आणि 1 बुलढाणा .
काल 11 अगस्त रोजी घुग्घुस येथील 68 वर्षीय महिलेचा कोरोना ने मृत्यु झाले आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसू शकते.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाचणी सुरू असून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बाधितांची संख्या अधिक आहे. नागरिकांनी शारीरिक अंतर पाळणे अत्यंत आवश्यक असून चंद्रपूर जिल्ह्यात संपर्कातील बाधिताची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातिल नागरिकांनी शारीरिक अंतर राखावे, कोरोना आजाराला गृहीत धरू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे. रुग्ण संख्या नियंत्रित करण्यासाठी रस्त्यावरील नागरिकांची संख्या कमी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन पुन्हा पुन्हा चंद्रपूर जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.