चंद्रपूर,28 अगस्त :चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1896 झाली आहे. गेल्या 24 तासात 97 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 1117 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 756 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 1117 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 23 सह एकूण 20 कोरोना (चंद्रपूर जिल्हा) बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.
68 वर्षीय कन्नमवार वार्ड बल्लारपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . श्वसनाचा आजार असल्याने बाधिताला 27 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय , चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले . मात्र , वैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करून देखील उपचारादरम्यान 27 ऑगस्टलाच सायंकाळी बाधिताचा मृत्यू झाला . या बाधिताला कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया व श्वसनाचा आजार होता . ( गेल्या 24 तासातील हा मृत्यु आहेत )