बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथे नुकतेच सुरुवात झालेल्या अभ्यासिकेला नवनिर्वाचित डी. वाय. एस. पी भरत महेर व तहसीलदार रवी सतवन यांचे मार्गदर्शन

बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथे नुकतेच सुरुवात झालेल्या अभ्यासिकेला नवनिर्वाचित डी. वाय. एस. पी  भरत महेर व तहसीलदार रवी सतवन यांचे मार्गदर्शन
लोकतंत्र की आवाज़,न्यूज़ नेटवर्क, चंद्रपुर
जालना/बदनापुर,15 अगस्त : बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथे नेमकीच लोकसहभागातून विद्यार्थी ना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली असून नुकतेच एम पी एस सी ची परीक्षा उत्तीर्ण होऊन. डीवायएसपी पदी निवड झालेले भरत महेर व तहसीलदार रवी सतवन यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला तर यश मिळाल्या शिवाय राहणार नाही. शिक्षण हेच वाघिणी चे दूध आहे. ते पिल्यावर कोण्ही ही गुरगुर केल्या शिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. त्या नंतर राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने अभ्यासिकेला १५ हजार रुपयाचे मोफत पुस्तक वाटप करण्यात आले. 
या प्रसंगी राजेवाडी गावाचे रहिवासी असलेले अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी लाईव मार्गदर्शन केले. या वेळी भागवत बिघोत,
 युवराज बहुरे,भगवान डोभाल, तोताराम बहुरे, रवी सतवन, भरत महेर,संजय गुसिंगे, प्रताप गुसींगे,कचरू गुसिगें, चैनसिंग गुसिंगे,संतोष गुसिंगे,राजुसिंग गुसींगे,व इतर गावकरी उपस्थित होते.