चंद्रपुर जिल्ह्यात : कोरोना योद्धा डॉक्टरचा मृत्यु corona

चंद्रपुर जिल्ह्यात : कोरोना योद्धा डॉक्टरचा मृत्यु

चंद्रपुर , 21 अगस्त : चंद्रपुर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर जिल्ह्यातील 34  वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला. 
           7 ऑगस्टला त्या डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता नंतर 12 ऑगस्टला त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत 11 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

         त्यांच्या मृत्यूने वैधकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे. चंद्रपुर जिल्ह्यात आज 5 वाजता पर्यन्त 57  नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या वाढलेली असून प्रशासन नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करीत आहे.