डेंग्यू बाबत संपूर्ण माहिती ठेवा , उपचारापेक्षा प्रतिबंध करून परिवाराची काळजी घ्या, चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आवाहन #Cmcchandrapur

डेंग्यू बाबत संपूर्ण माहिती ठेवा , 

उपचारापेक्षा प्रतिबंध करून परिवाराची काळजी घ्या,

चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आवाहन,
 
  चंद्रपूर, २७ ऑगस्ट (का प्र): आपल्या परीसरात डेंग्युचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी डेंग्यु डासाची उत्पत्ती टाळणे आवश्यक आहे याकरीता आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणुन पाळण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  डेंग्यू रोगास कारणीभूत असणारी एडीस ही मादी डास ही जमिनीपासून १०० मीटर पर्यंत उडू शकते त्यामुळे आपण आपल्या घराचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. 
 डेंग्यू रोगाचा डास हा स्वच्छ पाणी व काही दिवस साठवलेल्या पाण्यात फोफावणारा असल्याने आठवड्यातून एकदा तरी पाण्याची भांडी रिकामी करून घासून पुसून स्वच्छ करून ठेवावीत तसेच पाणी भरलेली भांडी घट्ट झाकून ठेवावीत. घर व परीसरातील पाणी साठ्यात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतल्यास आपण व आपल्या कुटुंबियांना याचा निश्चितच फायदा होईल.  
      महानगरपालिका आरोग्य व स्वच्छता विभागाद्वारे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. गणेश एजंसी प्लाट, संबोधी नगर, किरमे प्लाट, दर्यानगर येथे किटकनाशक फवारणी (स्प्रेईंग) करण्याची व डास अळी असलेले दूषित भांडी आढळल्यास अबेट, टेमिफॉस औषधी टाकण्यात येत आहे. , नाल्यांतील, खाच-खड्यात साचलेल्या पाण्यात जळलेले अॉईल टाकण्याची कार्यवाही सुरु आहे. शहरात धुरीकरण व औषध फवारणी सातत्याने करण्यात येत आहे. .डास अळी असलेले दूषित भांडी आढळल्यास आवश्यक तेथे  घरोघरी जाऊन डास अळी आढळणारी भांडी रिकामी करण्यासंबंधी नागरिकांना सूचना देण्यात येत आहे.