चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या कोरोनाबाधिताचा नागपूर येथे मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या कोरोनाबाधिताचा नागपूर येथे मृत्यू

चंद्रपूर दि ३ ऑगस्ट (जिमाका)  : चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या कोरोना बाधिताचा मृत्यू 2 ऑगस्ट रोजी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात झाला आहे. चंद्रपूर जिल्हा आरोग्य यंत्रणेने मृत्यू झाली असल्याची पुष्टी केली आहे.

       चंद्रपूर महानगरातील जयराज नगर परिसरात राहणाऱ्या 72 वर्षीय महिलेला गंभीर अवस्थेत 22 जुलैला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल केले त्यावेळेस त्यांची प्रकृती गंभीर होती. सुरुवातीपासून त्या ऑक्सिजन'वर होत्या. कोरोना आजाराच्या संक्रमणासोबतच डायबेटिस, ब्लडप्रेशर, आणि निमोनिया आजार त्यांना होता. त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीवरून त्यांना नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी देण्यात आली होती. 25 जुलैला त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले होते.

         जवळपास दहा दिवस त्यांची प्रकृती गंभीर होती. काल दुपारी ४च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याच्या नागपूरच्या खासगी इस्पितळाने स्पष्ट केले आहे. या महिलेच्या पतीला देखील कोरोनाची लागन झाली होती. 

        चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 58O वर पोहोचली आहे. यापूर्वी शनिवारी जिल्ह्यामध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला. काल पुन्हा महिलेचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 349 बाधित बरे झाले आहेत. तर 23O बाधितांवर चंद्रपूरमध्ये उपचार सुरू आहेत.