रेल्वेच्या विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर जयक़ीरणसिंह बजगोती यांची निवड

रेल्वेच्या विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर  जयक़ीरणसिंह  बजगोती यांची निवड

चंद्रपूर / बल्लारपुर, 11 अगस्त : सेंट्रल मध्य रेल्वेच्या नागपुर विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर बल्लारपुर चे माजी नगरसेवक जयक़ीरणसिंह  बजगोती यांची निवड करण्यात आली आहे.
         खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या शिफारशीनुसार सेंट्रल -मध्य रेल्वे नागपुर  विभागीय रेल्वेचे सीनियर कमर्शियल मैनेजर  के. एस. पाटिल  यांनी ही निवड केली आहे.  
त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. जयक़ीरणसिंह  बजगोती यानी या बद्दल खासदार बाळूभाऊ धानोरकर, पालक मंत्री विजय वड्डेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, रजनीताई हजारे, अब्दुल करीम भाई, शहर अध्यक्ष कांग्रेस कमिटी   यांचे आभार व्यक्त केले आहे.