राष्ट्रध्वजा च्या रंगाची प्रेरणादायी शक्ती युवा पिढीला मार्गदर्शक - महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार

राष्ट्रध्वजा च्या रंगाची प्रेरणादायी शक्ती युवा पिढीला मार्गदर्शक - महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार
    चंद्रपुर, 15 अगस्त (का प्र): भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 7. 40 वाजता माननीय महापौर सौ. राखी कंचर्लावार यांच्या शुभहस्ते सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना करून ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.  
          याप्रसंगी बोलताना माननीय महापौर म्हणाल्या राष्ट्रध्वजाच्या रंगांमध्ये अशी काही प्रेरणादायी शक्ती आहे, जी आपल्या क्षमतेच्या पुढे जाऊन कामगिरी करण्यास आपल्याला भाग पाडते. योग्य प्रमाणात असलेले हे रंग  म्हणजे संतुलनाचे प्रतीक आहे.
          तरुणांच्या ऊर्जेचे, उत्साहाचे स्वरूप आणि व्यवस्थापन यांचे योग्य संतुलन साधल्यास देशाच्या विकासात कशाचाच अडथळा राहणार नाही आणि भारताचा तिरंगा मानाने जगाच्या नकाशावर विराजमान होईल. आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा व अभिमानाचा आहे. हे स्वातंत्र्य अबाधित राखणे आपले कर्तव्य आहे.
          याप्रसंगी सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात आले. ध्वजारोहणास उपमहापौर तथा स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे, आयुक्त श्री.राजेश मोहिते, उपायुक्त श्री. विशाल वाघ तसेच नगरसेवक - नगरसेविका व कर्मचारी उपस्थित होते.