आतापर्यंत 4484 बाधित कोरोनातून बरे ;
3218 बाधितांवर उपचार सुरू
24 तासात 292 बाधितांची नोंद; पाच बाधितांचा मृत्यू
चंद्रपूर, दि. 20 सप्टेंबर: जिल्ह्यात 24 तासात 292 नवीन बाधितांची नोंद झाली असून बाधितांची एकूण संख्या 7 हजार 816 पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोना बाधितांची आजारातून बरे होण्याची संख्या देखील वाढत आहे. आत्तापर्यंत बरे झालेल्या बाधितांची संख्या 4 हजार 484 आहे. तर उपचार सुरू असणाऱ्या बाधितांची संख्या 3 हजार 218 आहे.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, तुकुम, चंद्रपूर येथील 59 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
दुसरा मृत्यू तुकुम, चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तिसरा मृत्यू वडगांव, चंद्रपुर येथील 47 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
चवथा मृत्यू वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 17 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तर,पाचवा मृत्यू पंचशील चौक, चंद्रपूर येथील 66 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 9 सप्टेंबरला क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले होते. वरील अनुक्रमे एक ते चार मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे. तर, पाचव्या बाधिताला कोरोनासह मधुमेह व न्युमोनिया असल्याने क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 114 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 107, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन, यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये
चंद्रपूर शहरातील 102 बाधित,
पोंभुर्णा तालुक्यातील 2,
बल्लारपूर तालुक्यातील 18,
चिमूर तालुक्यातील 2,
मूल तालुक्यातील 20,
गोंडपिपरी तालुक्यातील 8,
कोरपना तालुक्यातील 13,
ब्रह्मपुरी तालुक्यातील 31,
नागभीड तालुक्यातील 24,
वरोरा तालुक्यातील 20,
भद्रावती तालुक्यातील 17,
सावली तालुक्यातील 11,
सिंदेवाही तालुक्यातील 9,
राजुरा तालुक्यातील 13,
हिंगणघाट व चामोर्शी तालुक्यातील प्रत्येकी एक असे एकूण 292 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील
नेहरूनगर,
बाजार वार्ड,
ख्रिश्चन कॉलनी परिसर,
नगीना बाग,
भिवापुर वॉर्ड,
बंगाली कॅम्प परिसर,
एकोरी वार्ड, रामनगर,
दुर्गापुर,
पठाणपुरा वार्ड,
तुकूम,
बालाजी वार्ड,
अष्टभुजा वार्ड,
जगन्नाथ बाबा नगर,
बाबुपेठ,
जल नगर वार्ड,
घुटकाळा वार्ड,
गंज वार्ड,
विवेक नगर,
भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
ब्रह्मपुरी तालुक्यातील पेठ वार्ड, विद्यानगर, ओम नगर, ख्रिस्तानंद चौक परिसर, फुले नगर, लुंबिनी नगर, बालाजी वार्ड, गांधीनगर, शेष नगर, पटेल नगर,जानी वार्ड, प्रबुद्ध नगर या परिसरातून बाधित पुढे आले आहे.
भद्रावती तालुक्यातील ओमकार लेआउट परिसर, गांधी चौक परिसर, अहील्या देवी नगर, पाटील नगर, गुरु नगर, भगतसिंग वार्ड ,माजरी, बाजार वार्ड, सुदर्शन नगर परिसरातून बाधित ठरले आहे.
कोरपना तालुक्यातील तुकडोजी चौक परिसर, गांधी चौक परिसर, उपरवाही,
गडचांदूर, माणिकगड कॉलनी परिसर, शांती कॉलनी परिसर,शिवाजी चौक भागातून बाधित पुढे आले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, लोनवाही,भागातून बाधित ठरले आहे.
राजुरा तालुक्यातील शिवाजीनगर, रामपूर, कामगार नगर वार्ड, सिंधी, कुरली, बिरसा मुंडा नगर, माता मंदिर वार्ड, बाजार वार्ड, राजीव गांधी चौक परिसरातून बाधित पुढे आले आहे.
सावली तालुक्यातील सामदा, खेडी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
वरोरा तालुक्यातील चिनोरा, हनुमान वार्ड, सुभाष वार्ड, चरुरखटी, पांढूर्णी, भोपापुर, अभ्यंकर वार्ड, सलीम नगर भागातून बाधित पुढे आले आहे.
मूल तालुक्यातील वार्ड नं. 11, राजगड, चिमढा, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील पंडित दीनदयाल वार्ड, सरदार पटेल वार्ड, गणपती वार्ड, कोठारी, शिवनी चोर, श्रीराम वार्ड, बालाजी वार्ड ,बामणी भागातून बाधित पुढे आले आहे.
नागभीड तालुक्यातील पार्डी, पाहार्णी , नवेगाव पांडव, चिखल परसोडी, मिंडाळा, तळोधी, जीवनापूर परिसरातून बाधित ठरले आहे.