चंद्रपूर शहर व परीसरातील 117,24 तासात आणखी 233 बाधित; 3 बाधितांचा मृत्यू,चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 10242 corona

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 10242

6047 बाधित कोरोनातून  झाले बरे;

उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 4043

24 तासात आणखी 233 बाधित; 3 बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 30 सप्टेंबर : जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 233 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 10 हजार 242 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 4 हजार 43 असून आतापर्यंत 6 हजार 47 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, सरकार नगर, चंद्रपुर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 27 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू मंजुषा लेआउट परिसर, भद्रावती येथील 61 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 25 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, तिसरा मृत्यू राजुरा येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 28 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  अनुक्रमे पहिल्या बाधिताला कोरोनासह मधुमेह, दुसऱ्या बाधिताला कोरोनासह मधुमेह व उच्च रक्तदाब तर तिसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने या तीनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 152 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 143, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन तर भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 117, पोंभूर्णा तालुक्यातील तीन, बल्लारपूर तालुक्यातील 13, चिमूर तालुक्यातील 14, मुल तालुक्यातील नऊ, गोंडपिपरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील चार, ब्रह्मपुरी तालुक्यातील 20,  नागभीड तालुक्‍यातील चार, वरोरा तालुक्यातील पाच, भद्रावती तालुक्यातील 18, सावली तालुक्यातील चार,  सिंदेवाही तालुक्यातील नऊ, राजुरा तालुक्यातील आठ, गडचिरोली येथील दोन तर भंडारा व वडसा येथील प्रत्येकी एक असे एकूण 233  बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील बापट नगर, नगीना बाग, दुर्गापुर, ऊर्जानगर, वडगाव, इंदिरानगर, शास्त्रीनगर, महाकाली वार्ड, निर्माण नगर तुकुम, बालाजी वार्ड, शिवाजीनगर, लुंबिनी नगर, बाबुपेठ, भिवापुर वॉर्ड, हरिओम नगर, बंगाली कॅम्प परिसर, रयतवारी, जल नगर, जटपुरा गेट परिसर, एकोरी वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बिटीएस प्लॉट परिसर, झाकीर हुसेन वार्ड, बामणी, विद्या नगर वार्ड, बालाजी वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, विसापूर, मानोरा, महात्मा गांधी वार्ड, राणी लक्ष्मी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील रामनगर कॉलनी परिसर, पंचशील वार्ड, विवेकानंदनगर, जवाहर नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.वरोरा तालुक्यातील इंद्रप्रस्थ नगर, कर्मवीर वार्ड, सिद्धार्थ वार्ड, येन्सा, दत्त मंदिर वार्ड, मालवीय वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, पेठ वार्ड, फुलेनगर, किन्ही, टिळक नगर, रानबोथली, शिवाजीनगर, सौंदरी, गणेश वार्ड, गजानन नगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील सूर्य मंदिर वार्ड, गुरु नगर, लुंबिनी नगर, भंगाराम वार्ड, एकता नगर, नवीन सुमठाणा, सावरकर नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील पेठगाव, व्याहाड भागातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील सावरगाव, मुसाभाई नगर, मेंढा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चिमूर तालुक्यातील भिसी, विहीरगाव, जांभुळ घाट, वडाळा, आझाद वार्ड, गुरुदेव वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, कुकुडबोडी, शांती कॉलनी नांदा फाटा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.