जनता कर्फ्यू संदर्भातील उद्या ची बैठक पुढे टळली ? आता 18 सेप्टेंबर ऐवजी 21 सेप्टेंबर रोजी होणार बैठक #ChandrapurJantaCurfew

जनता कर्फ्यू संदर्भातील उद्या ची बैठक पुढे टळली ?

आता 18 सेप्टेंबर ऐवजी 21 सेप्टेंबर रोजी होणार बैठक

चंद्रपूर, 17 सेप्टेंबर (का प्र) : चंद्रपूर शहर आणि काही तालुक्यांच्या ठिकाणी कोरोना समूह संसर्ग सुरू झाल्यामुळे जिल्हा प्रशासन,         महानगरपालिका प्रशासन, नगर परिषद आणि आरोग्य यंत्रणा चिंतेत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंधरा दिवसाच्या “जनता कर्फ्यू ” लावण्यासाठी पालक मंत्री विजय वडेट्टीवार हे गंभीरपणे विचार करीत आहेत. त्या साठी शुक्रवारी उद्या 18/09/2020 रोजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासोबत विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती .चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंबंधीचे पत्रक काढले होते.

 परन्तु आज 17 सेप्टेंबर रोजी जिलाधिकारी कार्यालय चंद्रपूर ने पत्रक काढले आहे त्यात त्यांनी उद्या 18/09/ 2020 रोजी होणारी ही बैठक पुढे ढकलण्यात आली असुन आता ही बैठक 21/09/2020 रोजी दुपारी 1:00  वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चंद्रपूर येथे आयोजित करण्यात अली आहे.