39 लाख 90 हजारांचा सुगंधित तंबाखू साठयासह मुद्देमाल रामनगर पोलिसांनी केला जप्त #ChandrapurPolice

39 लाख 90 हजारांचा सुगंधित तंबाखू साठयासह मुद्देमाल रामनगर पोलिसांनी केला जप्त

चंद्रपूर, 06 सेप्टेंबर (का प्र): चंद्रपूर रामनगर पोलिस गुन्हे शोध पथकाला गुप्त माहितीच्या आधारे शहरात सुगंधित तंबाखूचा साठा येत असल्याची पक्की माहिती मिळाली.

त्याआधारे रामनगर  पोलिसांनी बंदोबस्त करीत सापळा रचला व रात्रीच्या सुमारास नागपूर रोड वरून बंगाली कॅम्पच्या दिशेने जाणारे आयशर वाहन क्रमांक MH- 34/AV- 2433 येताना दिसले, मिळालेली माहितीच्या आधारे त्या वाहनातच सुगंधित तंबाखू असणार अशी खात्री पटल्यावर वाहन थांबविण्यात आले, त्या वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये 25 नग साखरेच्या पिशव्या व 3600 नग मजा सुगंधित तंबाखूचे डब्बे किंमत 14 लाख 40 हजार, 160 नग ईगल कंपनीचे पाऊच किंमत 12 लाख व जप्त केलेले वाहन किंमत 13 लाख असा एकूण 39 लाख 90 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणात 2 आरोपीना अटक करण्यात आली आहे, 30 वर्षीय अपूर्व मुजुमदार, 20 वर्षीय सुकेश सरकार दोन्ही राहणार बंगाली कॅम्प यांचा समावेश आहे. 

राज्य प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची तस्करी लॉकडाउन च्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने मध्यंतरी पोलिसांनी सुगंधित तंबाखू बनविणारी फॅक्टरीवर धाड मारली होती परंतु त्यानंतर सुद्धा सुगंधित तंबाखू हा सर्रास पणे विकल्या जात आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी माहिती दिली की हा साठा कुठून आला व कुठे जात होता, याची माहिती काढण्यात येणार व संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार.

हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली.