आज रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात 5 कोरोना बाधितानचा मृत्यु #Covid-19 #ChandrapurCoronaUpdate

पहिला मृत्यु : चिमुर तालुक्यातील शिवरा येथील 40 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे .

 दुसरा मृत्यु : 70 वर्षीय विकास नगर वरोरा येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 1 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . 5 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता . 

तिसरा मृत्यू : 65 वर्षीय तुकुम चंद्रपुर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 3 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते . बाधिताला कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया आजार होता . 5 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे .

 चवथा मृत्यु : केळझर , तालुका मुल येथील 86 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . या बाधिताला 26 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने आज 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे . 

पाचवा मृत्यु : 90 वर्षीय दादमहल चंद्रपुर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे . 5 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते . आज 6 सप्टेंबरला बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे . या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता . ( गेल्या 24 तासातील हे पाच मुत्य आहेत )