चंद्रपूर शहर व परीसरातील 96 बाधित,जिल्ह्यात 24 तासात 199 बाधित; चार बाधितांचा मृत्यू,बाधितांची एकूण संख्या 8289; #ChandrapurCoronaUpdate #Covid-19

चंद्रपूर शहर व परीसरातील 96 बाधित

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 4754 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 8289;

उपचार सुरु असणारे बाधित 3413

जिल्ह्यात 24 तासात 199 बाधित; चार बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 22 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 199 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 हजार 289 झाली आहे. यापैकी 4 हजार 754 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 413 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांमध्ये चार कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये, सरकार नगर चंद्रपूर येथील 89 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 6 सप्टेंबरला क्राइस्ट हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू बाबुपेठ, चंद्रपुर येथील 67 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 17 सप्टेंबरला क्राइस्ट हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू बालाजी वार्ड, चंद्रपुर येथील 68 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 

तर, चवथा मृत्यू गांधी वार्ड, बल्लारपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. अनुक्रमे एक ते दोन मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह मधुमेह आजार असल्याने क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे. तर तिसऱ्या व चवथ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 122 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 115, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 96 बाधित,
 पोंभूर्णा तालुक्यातील चार, 
बल्लारपूर तालुक्यातील 28, 
चिमूर तालुक्यातील तीन, 
मूल तालुक्यातील तीन, 
गोंडपिपरी तालुक्यातील दोन,
 कोरपना तालुक्यातील एक, 
ब्रह्मपुरी तालुक्यातील 7, 
नागभीड तालुक्यातील 10, 
वरोरा तालुक्यातील 18, 
भद्रावती तालुक्यातील 6, 
सावली तालुक्यातील दोन, 
सिंदेवाही तालुक्यातील 9, 
राजुरा तालुक्यातील 10
 असे एकूण 199 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील 
संजय नगर, 
शंकर नगर, 
सरकार नगर, 
दुर्गापुर, 
इंदिरानगर, 
बाबूपेठ, 
नगीना बाग, 
रामनगर, 
विठ्ठल मंदिर वार्ड, 
जल नगर वार्ड, 
बंगाली कॅम्प परिसर, 
दादमहल वार्ड, 
घुटकाळा वार्ड, 
ख्रिश्चन कॉलनी परिसर, 
अंचलेश्वर वॉर्ड,
 एकोरी वार्ड, 
नेताजी चौक परिसर,
शिवाजी नगर, 
गोपाल नगर तुकुम, 
भवानी माता मंदिर परिसर, 
रयतवारी कॉलनी परिसर 
भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील कन्नमवार वार्ड, गोकुळ नगर, गणपती वार्ड, बुद्ध नगर, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसर, बालाजी वार्ड, महाराणा प्रताप वार्ड, परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा, अष्टविनायक नगर, महेश नगर भागातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील शिवाजी नगर खेड, विद्यानगर, शेष नगर, पटेल नगर, संत रवीदास चौक, बोरमाळा, भागातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

।भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, माजरी कॉलरी परिसर, सुरक्षा नगर भागातून बाधीत ठरले आहे.