डीन भगाओ चंद्रपूर बचाओ, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली तक्रार #DinBhagavoChandrapurBachavo #RamuTiwari #Chandrapur

डीन भगाओ चंद्रपूर  बचाओ

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली तक्रार

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात रुग्णाच्या तसेच मृत्यू दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या सर्व परिस्थितीवर अंकुश ठेवण्यात चंद्रपूर वैद्यकिय रुग्णालयाचे अधिष्ठाता सफसेल अपयशी ठरले असून डीन भगाओ चंद्रपूर  बचाओ अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.  

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. २०० च्या वर रुग्ण मिळत आहे. यामध्ये विविध आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या फार मोठी आहे. परंतु अपुरी आरोग्य सुविधा अपुरे वैद्यकीय अधिकारी यामुळे ज्या मुख्य आजाराने रुग्ण ग्रस्त आहे. त्यावर उपचार न करता कोरोना विषाणूंवर उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना समोर येत आहे. 

सध्या सर्वात मोठा भार जिल्ह्यातील चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयावर आहे. येथे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचाराकरिता येत आहे. परंतु कोरोना विषाणूच्या विविध चाचण्या करण्यात येते. मात्र ३ ते ४ दिवस त्याच्या अहवाल मिळण्याकरिता कालावधी लागत आहे. हि फार चिंतेची बाब आहे. शहरात अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णावर उपचार करायचा कसा असा प्रश्न पडला आहे. यात चंद्रपूर वैद्यकिय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांचे ढिसाळ नियोजन समोर आले आहे. त्यामुळे चंद्रपूर येथील कोरोना विषाणूची स्थिती सुदरवायची असेल तर  डीन भगाओ चंद्रपूर  बचाओ अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.