किल्ला च्या परकोटपासून नविन बांधकामावरील 100 मीटर पर्यंतची बंदी ऐवजी 9 मीटर करण्याची केंद्रीय मंत्र्याना पत्राव्दारे हंसराज अहीर यांची मागणी #HansrajAhir #ChandrapurKilla

किल्ला च्या परकोटपासून नविन बांधकामावरील 100 मीटर पर्यंतची बंदी ऐवजी 9 मीटर करण्याची केंद्रीय मंत्र्याना पत्राव्दारे हंसराज अहीर यांची मागणी

    चंद्रपूर,03 ऑक्टोबर (का प्र) : चंद्रपूर महानगरात सुमारे 11 कि.मी. परिघात ऐतिहासीक किल्ल्याची तटबंदी आहे. परंतु हे पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक घोशित केले असल्याने या संरक्षित स्मारकापासून 100 मीटर अंतरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणे  शक्य नसल्याने, महानगरातील सुमारे 1 लाख रहिवाषांना याचा फटका बसला असून सुमारे 10 ते 20 हजार कुटुंबांना कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नसल्याने या प्रभाव क्षेत्रातील नागरीकांच्या होणाऱ्या संभाव्य नुकसानीची दखल घेवून पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रिय संस्कृती मंत्र्यांना पत्राद्वारे गंभीर दखल घेवून नागरीकांना दिलासा देण्यासाठी पूरातत्व विभागाला किमान 9 मिटर अंतरापासून बांधकाम करण्यासाठी अनुमती देण्यासाठी आवश्यक  हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात अहीर यांनी सांगीतले की केंद्र सरकारच्या पा्रचीन स्मारक आणि पुरातत्वीय तथा अवशेष अधिनियम 1958 अनुसार संरक्षित स्मारकापासून 100 मीटर च्या आत कोणतेही बांधकाम करता येत नाही. परंतु महानगरात अनेक वर्षापूर्वी अनेकांची खाजगी मालमत्ता असून त्यावर बांधकाम सुद्धा झाले आहे. 

आता त्यात बदल अथवा पूनर्निमाण करण्यासाठी महानगरपालीका पुरातत्व विभागाच्या अपरोक्त कायद्यामुळे परवानगी देत नसल्याने सुमारे लाखाच्या वर नागरीकांना याचा अकारण फटका बसत असल्याचे लक्ष वेधत अहीर यांनी सध्या पुरातत्व विभाग पराकोटापासून 9 मीटर अंतरापर्यंत संरक्षित भिंतीचे बांधकाम करत असल्याने तोच आधार किमान 9 मिटर नंतर बांधकाम करण्यासाठी महानगरात सुट द्यावी आणि यामुळे हजारो परीवारांची समस्या दूर होईल असा तोडगा काढण्यासाठी केंद्रीय संस्कष्ती मंत्र्यांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केलेली आहे.

याचसोबत चंद्रपूर महानगरात अनेक आर्थिकदृष्टया   दुर्बल परिवारांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधकाम करण्यासाठी अर्ज सादर केले परंतु त्यांना सुद्धा पुरातत्व विभागाच्या सदर अटीमुळे आवास योजनेचा लाभ घेता येत नाही. 

प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची गरीबांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याची महत्वाकांक्षी योजना असल्याने पूरातत्व विभागाने आपल्या निकशात बदल करुन गरीबांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी नियमात शिथिलता देण्याची गरज असल्याचे अहीर यांनी प्रतिपादन करीत सतत चंद्रपूर महानगरातील परकोटा लगतचे बांधकाम करण्यासाठी किमान 9 मीटर पर्यंतची सीमारेशा  निश्चित करण्याचा आग्रह पूरातत्व विभाग व केंद्रिय मंत्र्यांकडे केला आहे.

चंद्रपूर महानगरात पूरातत्व विभागाच्या अशा सक्तीमुळे जनाक्रोष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पूरातत्व विभागाचे अधिकारी व केंद्रिय मंत्र्यांनी तातडीने या संदर्भात निर्णय घेण्याची मागणी अहीर यांनी केंद्रिय संस्कृती मंत्र्यांना केली आहे.