चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 11014 बाधित कोरोनामुक्तचंद्रपूर जिल्ह्यात 212 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन बाधितांचा मृत्यू बाधितांची एकूण संख्या 14202 उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या 2977 #CoronaChandrapur

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 11014 बाधित कोरोनामुक्त

चंद्रपूर जिल्ह्यात 212 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन बाधितांचा मृत्यू

 बाधितांची एकूण संख्या 14202

 उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या  2977

चंद्रपूर, दि. 22 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे दोन मृत्यू झाले असून 212 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 14 हजार 202 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  153  बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 11 हजार 14 झाली आहे.  सध्या 2 हजार 977 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 12 हजार 799  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 97 हजार 186 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपुर शहरातील क्रिष्णा नगर  येथील 70 वर्षीय पुरुष व 

वरोरा शहरातील अभ्यंकर वार्ड येथील 75 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 211 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 200, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ पाच आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 132 पुरूष व 80 महिलांचा समावेश आहे. 

यात चंद्रपूर शहर व परिसरातील 82 बाधित, बल्लारपूर तालुक्यातील 7,
 चिमूर तालुक्यातील 5, 
मुल तालुक्यातील 32, 
गोंडपिपरी तालुक्यातील 6,
 जिवती तालुक्यातील 1, 
कोरपना तालुक्यातील 10, 
ब्रह्मपुरी तालुक्यातील 9, 
नागभीड तालुक्यातील 6,
  वरोरा तालुक्यातील 11,
भद्रावती तालुक्यातील 10, 
सावली तालुक्यातील 1,  
सिंदेवाही तालुक्यातील 25,
राजुरा तालुक्यातील 3
 तर नागपूर, वर्धा, आदीलाबाद, गडचिरोली येथील प्रत्येकी एक असे एकूण 212 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील 
प्रगती नगर,
 इंदिरानगर, 
 तीर्थरूप नगर, 
सुमित्रा नगर, 
बाबुपेठ, 
अरविंद नगर,
हनुमान नगर,
 जगन्नाथ बाबा नगर, 
कृष्णा नगर, 
श्रीराम वार्ड, 
नगीना बाग, 
ऊर्जानगर, 
संजय नगर, 
भानापेठ वार्ड, 
बालाजी वार्ड, 
महाकाली वार्ड, 
राष्ट्रवादी नगर, 
विवेकानंदनगर, 
पठाणपुरा वॉर्ड,
 लालपेठ, 
लक्ष्मी नगर, 
विठ्ठल मंदिर वार्ड,
 ऊर्जानगर,
 घुग्घुस, 
तुकूम 
भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील टिळक वार्ड, रेल्वे वार्ड, विवेकानंद वार्ड, किल्ला वार्ड भागातून बाधित ठरले आहे. 

वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसर, सोईट, माढेळी, अभ्यंकर वार्ड, स्वप्नपूर्ती नगर, मोकाशी लेआऊट   परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधी नगर, बोरगाव, आंबेडकर चौक परिसर, विद्यानगर, अर्जुनी मोरगाव,मेढंकी, रमाबाई चौक परिसर,कुरझा परिसरातून बाधित ठरले आहे. 

भद्रावती तालुक्यातील विनायक नगर माजरी, हनुमान नगर, श्रीराम नगर, संताजी नगर, पांडव वार्ड, भोज वार्ड, किल्ला वार्ड, सुरक्षा नगर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील जवाहर नगर, मार्डा, पेठ वार्ड,भागातून बाधित पुढे आले आहे. 

चिमूर तालुक्यातील  नेताजी वार्ड, क्रांतीनगर, पळसगाव भागातून बाधित ठरले आहे. 

सिंदेवाही तालुक्यातील चोकेपूर, नवरगाव, अंतरगाव, चारगाव, रत्नापूर, पिपर्डा, नवेगाव परिसरातून पॉझिटिव ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील वाढोणा, कोदेपार, नवेगाव पांडव, कन्हाळगाव, भागातून बाधित पुढे आले आहे.

मुल तालुक्यातील चिंचाळा, ताडाळा,आनंदनगर, चारगाव,गडीसुर्ला, राजगड भागातून बाधित ठरले आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा झुलूरवार परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

जिवती तालुक्यातील पाटण भागातून बाधित पुढे आले आहे. 

गोंडपिपरी तालुक्यातील चेक दरुर, जोगापूर,लाठी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. 

कोरपना तालुक्यातील माणिकगड कॉलनी परिसर, गडचांदूर भागातून बाधित ठरले आहे.