चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत 12048 बाधित झाले बरे, गेल्या 24 तासात 188 नव्याने बाधित ; 1 बाधिताचा मृत्यू उपचार घेत असलेले बाधित 2778, चंद्रपुर जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 15049 #Corona

चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत 12048 बाधित झाले बरे

गेल्या 24 तासात 188 नव्याने बाधित ; 1 बाधिताचा मृत्यू

 उपचार घेत असलेले बाधित 2778

चंद्रपुर जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 15049

चंद्रपूर, दि. 27 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एका बाधिताचा मृत्यू झाला असून 188 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 15 हजार 49 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  188 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 48 झाली आहे.  सध्या 2 हजार 778 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 16 हजार 762  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1 लाख हजार 167 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यु झालेल्या बाधितामध्ये चंद्रपुर शहरातील छत्रपती नगर येथील 73 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 223 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 210, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली चार, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 110 पुरूष व 78 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 78 बाधित, बल्लारपूर तालुक्यातील पाच, चिमूर तालुक्यातील तीन, मुल तालुक्यातील सहा, जिवती तालुक्यातील चार, कोरपना तालुक्यातील आठ, ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ, नागभीड तालुक्यातील दोन,  वरोरा तालुक्यातील 23,भद्रावती तालुक्यातील 10, सावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील 20, राजुरा तालुक्यातील 12, गडचिरोली सहा, भंडारा व यवतमाळ येथील प्रत्येकी एक असे एकूण 188 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परीसरातील लालपेठ, भिवापुर वॉर्ड, स्वस्तिक नगर, महाकाली वार्ड, गौतम नगर, बापट नगर, बाबुपेठ, लोहारा, वाघोबा चौक तुकुम, दुर्गापुर, महाकाली कॉलनी परिसर, ऊर्जानगर, विश्वकर्मा नगर, सुशिल नगर, गजानन मंदिर परिसर, बालाजी वार्ड, शिवाजीनगर, शालिनीनगर, वडगाव, घुग्घुस, आंबेडकर नगर, श्याम नगर, रामनगर, नगीना बाग, पडोली, तीर्थरूप नगर, शास्त्रीनगर भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

वरोरा तालुक्यातील  आशीर्वाद नगर, चिकणी, आझाद वार्ड, सुभाष वार्ड, वाघनख, कटारिया ले आऊट परिसर, अभ्यंकर वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, आनंदवन परिसर, आशीर्वाद लेआउट परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधीनगर, पटेल नगर, विद्यानगर, गाडगेबाबा नगर, पेठवार्ड परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगर, झाडे प्लॉट परिसर, राजवाडा टाऊनशिप, सुरक्षा नगर, शिंदे लेआउट परिसर, पिपरबोडी,परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील सातरी, सास्ती, दोहेवाडी, शिवाजीनगर, किसान वार्ड, मज्जिद वार्ड, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसर, राजीव गांधी चौक  भागातून बाधित पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील शिवनी, देलनवाडी, पळसगाव, नवरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील तळोधी, सुलेझरी,भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील माणिक गड कॉलनी परिसर, गडचांदूर भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील मारोडा, वार्ड नंबर 14 परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील  साईबाबा वार्ड, बिल्ट कॉलनी परिसर, सुभाष वार्ड, विसापूर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी, भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.