चंद्रपूर शहर व परिसरातील 125, 24 तासात 315 नवीन बाधित; 3 बाधितांचा मृत्यू, जिल्ह्यात आतापर्यंत 9492 बाधित कोरोनातून झाले बरे corona


जिल्ह्यात आतापर्यंत 9492 बाधित कोरोनातून झाले बरे

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3061

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 12746 वर

24 तासात 315 नवीन बाधित; 3 बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 14 ऑक्टोंबर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 1 हजार 59 स्वॅब नमुने तपासले असून त्यामधुन 315 नवीन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 12 हजार 746 वर गेली आहे. आतापर्यंत 9 हजार 492 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 61 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितामध्ये, सिस्टर कॉलनी परीसर, चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 11 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू मुल येथील 82 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, तिसरा मृत्यू रयतवारी,चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 16 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. दुसऱ्या व तिसऱ्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तीनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 193 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 184, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये

 चंद्रपूर शहर व परिसरातील 125, 
पोंभूर्णा तालुक्यातील 1,
 बल्लारपूर तालुक्यातील 5,
 मुल तालुक्यातील 46, 
गोंडपिपरी तालुक्यातील 1,
 कोरपना तालुक्यातील 1,
 ब्रह्मपुरी तालुक्यातील 21, 
नागभीड तालुक्यातील 34, 
 वरोरा तालुक्यातील 15, 
भद्रावती तालुक्यातील 13,
 सावली तालुक्यातील 11,
 सिंदेवाही तालुक्यातील 27, 
राजुरा तालुक्यातील 10, 
यवतमाळ 2
 तर गडचिरोली येथील 3
 असे एकूण 315 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील
 सिविल लाइन,
 इंदिरानगर,
प्रगती नगर,
 सिस्टर कॉलनी परिसर,
 कृष्णनगर, 
दुर्गापुर, 
ऊर्जानगर, 
अंचलेश्वर वॉर्ड, 
रामनगर,
बाबुपेठ, 
जल नगर, 
विठ्ठल मंदिर वार्ड, 
तुकुम, 
नगीना बाग,
 जटपुरा वार्ड,
 घुटकाळा वार्ड,
 बालाजी वार्ड, 
भिवापूर वार्ड, 
वडगाव, 
भानापेठ, 
समाधी वार्ड परिसरातून 
पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

पोंभूर्णा तालुक्यातील चिंधलधाबा परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्ड, विसापूर, मानोरा, भागातून बाधित ठरले आहे. 

 मुल तालुक्यातील वार्ड नंबर 3, वार्ड नंबर 10, वार्ड नंबर 14 ,वार्ड नंबर 15, वार्ड नंबर 16, राजोली, मारोडा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील शिवाजी चौक परिसरातील बाधित ठरले आहे.

 कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. 

ब्रह्मपुरी तालुक्यातील पटेल नगर, टिळक नगर , विद्यानगर, देलनवाडी, कुर्झा वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील खडकी, पंचायत समिती परिसर, गिरगाव, किटाली मेंढा, कोजाबी माल, चिखल परसोडी, मेंढकी, गाय डोंगरी, गुजरी वार्ड, सुंदर नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

वरोरा तालुक्यातील बावणे लेआऊट परिसर, चिनोरा भागातून बाधित पुढे आले आहे.

भद्रावती तालुक्यातील विश्वकर्मा नगर, श्रीराम नगर, गौतम नगर, ओंकार नगर परिसरातून बाधित ठरले आहे. 

सावली तालुक्यातील रुद्रापुर, लोंढली भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

 सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर, जीवनपूर, वसेरा, नवरगाव, पळसगाव, परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

राजुरा तालुक्यातील शिवाजी वार्ड, सोमनाथपूर वार्ड, चुनाभट्टी, नेहरू चौक, जवाहर नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.