आज शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यात 126 नवीन कोरोना बाधितांची नोंद, एकूण बाधित 11890 ,एकूण मृत्यु 181 (जिल्ह्यातील 172) #Corona #Chandrapur

चंद्रपूर, 10 ऑक्टोबर (का प्र): चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 11890 झाली आहे. गेल्या 24 तासात 126 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 8769  बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 सध्या जिल्ह्यामध्ये 2940 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 8769 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 172 सह एकूण 181 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.