आज रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात 187 नवीन कोरोना बाधितांची नोंद, एकूण बाधित 12077 , एकूण मृत्यु 184 (जिल्ह्यातील 175) #corona

चंद्रपूर, 11 ऑक्टोबर (का प्र): चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 12077 झाली आहे. गेल्या 24 तासात 187  नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 8843  बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3050 बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 8843 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 175 सह एकूण 184 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.