चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने 200 ऑक्सिजन सुविधायुक्त बेड chandrapur 200 oxygen beds

चंद्रपूर जिल्ह्यात नव्याने 200 ऑक्सिजन सुविधायुक्त बेड

चंद्रपूर, दि.8 ऑक्टोबर: जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता रुग्णांना योग्य ते उपचार वेळेत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोना बाधितांना ऑक्सिजनची उपलब्धता व्हावी यासाठी जिल्ह्यात नव्याने ऑक्सिजन सुविधायुक्त 200 बेडची उपलब्धता केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्याची गरज असते. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात आल्याने रुग्णावर त्याच ठिकाणी उपचार केले जातील. त्यामुळे तालुक्‍यातील उपलब्ध सोयीमुळे रुग्णांना इतरत्र जाण्याची आवश्यकता भासणार नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात तसेच स्थानिकांना आहे त्या भागातच उपचाराची सोय व्हावी यासाठी आरोग्य विभागामार्फत नव्या ऑक्सिजनयुक्त 200 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

नव्याने या ठिकाणी आहेत ऑक्सिजन युक्त बेड:

क्राइस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे 50, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 25, राजुरा येथे 50 तर  ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे 75 ऑक्सिजनयुक्त बेड असे एकूण 200 बेड जिल्ह्यात वाढविण्यात आले आहे. प्रथमताच राजुरा आणि ब्रम्हपुरी येथे कोरोना रुग्णांना उपचार मिळणार असल्यामुळे चंद्रपूर येथे येणाची आवश्यकता राहणार नाही . यामुळे चंद्रपूर रुग्णालयावरील भार ही कमी होण्यास मदत होईल.