मागील 24 तासात चंद्रपूर जिल्ह्यात 173 नवीन कोरोना बाधितांची नोंद, एकूण बाधित 13400, एकूण मृत्यु 199 (जिल्ह्यातील 188) #CoronaChandrapurUpdate

चंद्रपूर, 18 ऑक्टोबर (का प्र): चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 13400  झाली आहे. गेल्या 24 तासात 173 नवीन बाधित पुढे आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 10276  बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

 सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2925  बाधित उपचार घेत आहे.

आतापर्यंत 10276 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातील 188 सह एकूण 199 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.